पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर तहसील कार्यालयातील महसूल रेकॉर्ड विभागामध्ये कर्मचारी व अधिकारी यांच्या संगनमताने सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरून अंदा धुंद कारभार चालू असल्याचे दिसून येत आहे.
यामध्ये पंढरपूर तहसील कार्यालय आवारामध्ये सेतूमधिल फेरफार दाखला मागणी अर्ज व महसूल पावती नसताना रेकाॅर्ड विभागमधिल अधिकारी यांच्या सही व शिक्याचा फेरफार कर्मचारी कसेकाय देत आहेत याची पंढरपूर तहसिलदार यांनी तात्काळ गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती चौकशी करून संबंधितांवर कारवाई करणे गरजेचे बनले आहे हा प्रकार आर्थिक हव्यासापोटी होत असावा अशी शंका नागरीकांमधून व्यक्त केली जात आहे.
तसेच हा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्याचेही बोलले जातेय त्यामुळे येथिल वरिष्ठ अधिकारी यांना याची कल्पना नसावी का असाही प्रश्न उपस्थित होत आहे एकंदरीत या सर्व प्रकरणाचा सामान्य नागरिकांना नाहक ञास सहन करावा लागत आहे.
कारण याठिकाणी दाम करी काम या मराठी उक्ती प्रमाणे कामकाज चालत असेल तर लोकशाही मार्गाने पंढरपूर तहसिल कार्यालयासमोर या महसूल रेकाॅर्ड मधिल अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी उग्र आंदोलन करावे लागेल असा इशारा पंढरपूर आम आदमी पार्टीचे सचिव नागेश पवार यांनी दिला आहे.