बोरामणी प्रतिनिधी
दक्षिण सोलापूर तालुक्यातील एस व्ही सी एस हायस्कूल, बोरामणी येथे प्रशालेतील सहाशिक्षिका सौ शमशादबानू शेख मॅडम यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सत्कार समारंभ संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री बृहन्मठ होटगी संस्थेचे सचिव श्री शांतय्या स्वामी सर हे होते. त्यांचाच शुभहस्ते परमपूज्य श्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामींजी व परमपूज्य तपोरत्न योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामींजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक श्री शिवप्पा बिराजदार सरांनी केले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री स्वामी सरांचे स्वागतपर सत्कार प्रशालेचे मा मुख्याध्यापक श्री राम ढाले सरांनी पुष्पगुच्छ देऊन केले.
तद्नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री स्वामी सर व सौ भारती रेऊरे मॅडम यांच्या हस्ते सौ शमशादबानू शेख मॅडम व त्यांचे पती श्री फझलमहमूद शेख सर यांचे पूर्ण आहेर,शाल,पुष्पहार व महास्वामींजीची प्रतिमा देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्रशालेतील सहाशिक्षिका सौ सुलोचना विजापुरे मॅडम,सौ लक्ष्मी राजमाने मॅडम,श्री शादाफ शेख,श्री फझलमहमूद शेख सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सत्कार मूर्ती सौ शेख मॅडम यांनी म्हणाले की, संस्थेच्या विविध शाखेतून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी मनोभावे ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले. सेवाकालावधित संस्थेच्या कर्मचाऱ्यांपासून अधिकाऱ्यापर्यंत सर्वांचेच सहकार्य लाभल्याचे सांगितले.
प्रशालेचे मा मुख्याध्यापक श्री ढाले सरांनी आपल्या मनोगतात म्हणाले की, मॅडमनी आपल्या प्रभावी अध्यापनामुळे सर्व विद्यार्थ्यांच्या आदर्श शिक्षिका बनल्या. बोरामणी प्रशालेत कमी सेवा झाली असली तरी भवानी पेठ प्रशालेत त्यांनी शालेय अभ्यासक्रमाबरोबर सहशालेय उपक्रम, बहिस्थ परीक्षेतील त्यांच्या कार्याविषयी मला जाण असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री स्वामी सरांनी आपल्या मनोगतात म्हणाले की,मॅडमनी विद्यार्थी हेच आपले दैवत असून त्यांच्या प्रगतीसाठी त्या सतत धडपडत असत.विद्यार्थ्यांना अध्यापनाबरोबर चांगले संस्कारही दिले. तसेच त्यांचीही मुले संस्कारित व उच्चविद्याविभूषित असून चांगल्या हुद्यावर कामाला आहेत. हे त्यांनी केलेल्या कार्याचे फळ असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री यशवंत राजमाने सरांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक वृंद व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.