सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर विद्यापीठ सीनेट निवडणूक 2022 सुटा संघटना यांच्या वतीने पंढरपूर तालुक्यातून उपसरपंच गणपत मोरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली मागील काही दिवसापासून सोलापूर विद्यापीठाचे निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे.
उमेदवारी माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी बऱ्याच उमेदवारांनी आपल्या अर्ज माघारी घेतली या निवडणुकीसाठी सुटा संघटनेमार्फत जिल्ह्यातून 09 उमेदवार देण्यात आले आहेत .
यामध्ये ओपन मधून गणपत मोरे यांना उमेदवारी देण्यात आले आहे गणपत मोरे हे पंढरपूर तालुक्यातील सुटाचे उमेदवार आहेत त्यांच्या उमेदवारीचे सर्वजण स्वागत करीत आहेत मागील काही दिवसापासून त्यांचा प्रचाराचा वेग वाढत चाललेला दिसत आहे प्रत्यक्ष भेटी गाठी घेणे पत्रव्यवहार करणे अशा विविध माध्यमातून गणपत मोरे हे प्रचारामध्ये आघाडीवर दिसत आहेत मतदार त्यांना पसंत क्रमांक 01 चे मत देतील असा त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे