तांदुळवाडी प्रतिनिधी
तांदुळवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री.शशिकांत कदम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज दिनांक 30 सप्टेंबर 2022रोजी उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली. सदर निवडीची सभा विद्यमान सरपंच सौ.जाधव, तसेच विस्तार अधिकारी श्री. मुंडफणे बी. डी यांच्या उपस्थितीत पार पडली.
आज रोजी निवडणूक कार्यक्रम सुरू झाल्या नंतर विकास चव्हाण यांचा एकमेव अर्ज आल्याने सदर निवडणूक बिनविरोध झाली.
यावेळी ग्रामपंचायतीचे सदस्य श्री.शशिकांत कदम,विकास चव्हाण, सतीश कदम, लक्ष्मण मासाळ, अनिल लोखंडे ,भीमाशंकर गूजरे, सौ.मंगल धनवडे, नंदा कदम, स्मिता काकडे ,अंजना लोखंडे ,सुवर्णा शेळके तसेच आघाडी चे सर्व सदस्य विकास सोसायटी चेअरमन सर्व संचालक,मार्गदर्शक उपस्थित होते.
आज पर्यंतच्या इतिहासातील सर्वात तरुण सरपंच म्हणून ते निवडून आले आहेत.गाव खेड्यातील लोकांच्या अपेक्षे प्रमाणे ते काम करतील ही आशा व्यक्त करून त्यांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.