पंढरपूर शहर व तालुका परीट धोबी सेवा मंडळाच्या वतीने निवेदन
पंढरपूर प्रतिनिधी
निष्काम कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या दशसुत्री विचारांनी राज्य चालावे व गरजवंतांना मदत मिळावी या उद्दात्त हेतुने व राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या दशसुत्री विचारांचा व्यापक प्रचार व प्रसार व्हावा यासाठी मा.मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर दशसुत्रीचे अनावरण करुण कायमस्वरूपी लावण्यात आले होते.
परंतु सध्या असलेल्या शासनाला राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या विचारांचा विसर पडलेला आहे.प्रवेश द्वारावरील दशसुत्री कुबुद्वीने हटविणाऱ्या शासनाचा
राष्ट्रसंत गाडगेबाबांची दशसुत्री प्रवेशद्वारावर सन्मानपूर्वक लावावी या मागणीसाठी पंढरपूर शहर परीट समाजाच्या वतीने उपविभागीय अधिकारी पंढरपूर यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी पंढरपूर शहर परीट समाजाचे शहराध्यक्ष व नगरसेवक मा श्री विजय वरपे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश ननवरे, तालुका अध्यक्ष बाळासाहेब घोडके, तंटामुक्त शहर अध्यक्ष सतिश भोसले, युवक शहर अध्यक्ष रामेश्वर सांळुखे,मा अध्यक्ष कैलास नवले, सुनील कारंडे, नागेश राऊत, कांतीलाल वरपे,सुरज कदम आदी उपस्थित होते.