केसकरवाडी प्रतिनिधी बिरूदेव केंगार
पंढरपूर तालुक्यातील केसकरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलीच्या वाढदिवसाचे निमित्त साधून शाळेत मुलांना खाऊ व शाळेत वृक्षारोपण करण्यात आले. केसकरवाडी येथे पंचशील दूध डेअरीचे चेअरमन संजयराजे मासाळ यांच्या संस्कृती या मुलीच्या 7व्या वाढदिवसानिमित्त मुलांना खाऊ व शाळेत वृक्ष देऊन साजरा करण्यात आला.
यावेळी तानाजी केसकर, जमदाडे सर, माऊली केसकर,शाळा मुख्याध्यापक गुजरे मॅडम, वाघमारे गुरुजी, मस्के गुरुजी, लंगोटे गुरुजी,माऊली माने, लहू केसकर, उत्तम मासाळ, बाळू मुजावर, राजकुमार मासाळ, लक्ष्मण केसकर, जाधव ग्रामसेवक, सहदेव ढोबळे, विद्यार्थी,पालक,ग्रामस्थ इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संजयराजे मासाळ यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.विद्यार्थ्यांनी व पालकांनी मुलांच्या वाढदिवसानिमित्त विविध प्रकारचे उपक्रम राबविले पाहिजेत अशी चर्चा ग्रामस्थांनी यावेळी केली.