अकलूज प्रतिनिधी
निमीत्त होत विद्यापीठ निवडणुक मतदानासाठी आदरणीय दादासाहेब महाविद्यालयात आलेले होते.गाडीतून उतरताच खांदयावर बँग असलेल्या एका विद्यार्थ्यास जवळ बोलाविले त्याच्या खांद्यावर हात टाकला म्हणाले मोबाईल आहे का...त्याला विचारले 14 ऑगष्टच्या कार्यक्रमास होतास..पुढे दोन तीन विदयार्थी भेटले त्यांनाही तेच प्रश्न करीत सोबतच्या प्राध्यापक मंडळी यांचेशी चर्चा केली व मतदान केंद्राकडे गेले मतदान करून बाहेर आले...
प्रसन्न चेहरा,भारावून टाकणारी प्रचंड ताकदीची उर्जा आणि महाविद्यालयातील मुलांचे विषय वाटणारी आस्था हि जाणवित प्रांगणात असलेल्या विदयार्थ्यांना सोबत करीत,मित्र करीत,जवळ बोलावित प्रत्येका सोबत फोटो काढीत राजासारख मन असलेला हा जाणता राजा प्रत्येकाच्या मनात घर करीत पुढे जात होते.
महाविद्यालय, परीसर,ग्रामीण भागातील मुले यांच्या चेहर्यावरील नेमकेपणा टिपत येईल त्या सर्वांचे सोबत पायरीवर बसूनच फोटो काढले दादांचा हा मोठेपणातला साधेपणा खुप भावतो...नव्हे तर नकळत प्रेमात पाडतो.
ऑफिसमध्ये येत असतानाच ज्युनियर कॉलेजच्या विदयार्थी जे 14 ऑगस्ट च्या कार्यक्रमास उपस्थित होते त्यांना बोलाविण्यास सांगितले.सर्व ऑफिस गच्च भरले,विदयार्थीनी जास्त होत्या...दादा म्हणाले तुम्ही कॉलेजचे विदयार्थी वाटत नाही...सगळे चेहरे घाबरल्या सारखे कसे...अरे कॉलेज लाईफ आहे एंजॉय करा पुन्हा काॅलेजच्या जीवनाचा आनंद मिळणार नाही.कॉलेज शिकण्यापेक्षा कॉलेजमध्ये स्वच्छंदी जगा आणि ज्या दिवशी तुम्ही कॉलेज जगायला सुरवात कराल त्यादिवशीपासूनच आयुष्याचा सोहळा सुरू होईल.
इथल्या प्रत्येक गोष्टीत सहभाग घ्या.फुलासारखे बागडा, सुंगधीत व्हा...पुन्हा कॉलेजचे हे दिवस येत नाहीत...असे म्हणत असतानाच जे विदयार्थी 14 ऑगष्टच्या कार्यक्रमास चित्ररथाच्या रँलीमध्ये सहभागी होते त्या सर्वांना सयाजीराजे पार्कची सहल आयोजित करण्याचे निर्देश प्राचार्य बागडे यांना केले...
दादा आले,त्यांनी पाहिले,त्यांनी मनं जिंकलं...गाडीत बसून जात असतानाच राष्ट्रीय सेवा योजना सप्ताहात रांगोळी स्पर्धा चालू होते त्याठिकाणी जावून रांगोळी पाहिल्या त्यांचे सोबत फोटो काढले...स्मितहास्य करीत गाडी मार्गस्थ झाली.
नसानसात,दिसामासात, मनामनात,एकच ध्यास देशभक्ती...शिवभक्ती...राष्ट्रभक्ती.
-:शब्दांकन:-
*डॉ.विश्वनाथ आवड*
शंकरराव मोहिते महाविद्यालय,अकलूज.