सोलापूर प्रतिनिधी
निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशालेने जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक पटकाविले. राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी या विज्ञान वस्तूची निवड करण्यात आली आहे.
नुकतेच जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन ऑनलाइनद्वारे भरविण्यात आले होते.या प्रदर्शनात सोलापूर शहर जिल्ह्यातील विज्ञान प्रयोगशाळा सहाय्यक गटात १२ वस्तू मांडण्यात आले.प्रत्येक प्रयोगशाळा सहाय्यकांनी विज्ञान वस्तू संबधी प्रात्यक्षिक सादर केले.या विज्ञान वस्तूमधून निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशालेचे प्रयोगशाळा सहाय्यक विनायक कोरे यांनी सादरीकरण केलेले 'इंधन बचत व पर्यावरण वाचवा' या विषयावरील वस्तूने प्रथम क्रमांक पटकाविले.तज्ञ विज्ञान मार्गदर्शक समितीने या विज्ञान वस्तूची राज्य स्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड केली आहे.यशाबद्दल
संस्थापक अध्यक्ष अण्णाराव कुंभार, प्राचार्य विजयकुमार हुल्ले, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे व सहकारी शिक्षकांनी प्रयोगशाळा सहाय्यक विनायक कोरे यांचा पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले.
- *पर्यावरण वाचविणे काळाची गरज*
बेपर्वाई इंधन वापरामुळे पृथ्वीच्या पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे.पुढच्या पिढीला चांगले जीवन जगण्यासाठी आत्तापासूनच इंधन बचत करुन पर्यायाने पर्यावरण वाचविणे काळाची गरज असल्याचे प्रयोगातून दिसते.भविष्यासाठी हि विज्ञान वस्तू उपयुक्त असणारे आहे.