भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स या महाविद्यालयाच्या वतीने रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती.
यावेळी पद्मम भूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 135 व्या जयंती सोहळ्या निमित्त प्रतिमेचे पूजन स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन संभाजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सरपंच राजकुमार पाटील, उपसरपंच सविता लोखंडे,दिपक गवळी, सुनील पाटील, लुकमान इनामदार ,नितीन शिंदे,भिमराव जाधव आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी झांज ,टिपरी ,लेझीम, ढोल ताशा पथक,आर्मी पथक, डिजे लावून गावातील प्रमुख बाजार पेठेतून वाजत गाजत,जयघोष करत मिरवणूक काढली होती.या कार्यक्रमाचे आयोजन शिक्षक सागर काळे , गजानन जमदाडे व शिक्षक यांनी केले होते.
कला शिक्षक डी एल गोंजारी यांनी रायगड किल्याच्या कल्याण दरवाज्याची प्रतिकृती तयार केली होती.
यावेळी प्राचार्य गायकवाड म्हणाले की,आणाच्या जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन रविवार 25/09/2022 रोजी सकाळी 9=30 वाजता केलेले आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.
यावेळी विद्यार्थी, पालक शिक्षक,कर्मचारी,ग्रामस्थ आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.