सोलापूर प्रतिनिधी
लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटी च्या वतीने डाॅ. एम. एस. स्वामी आणि डॉ. शिवानी एम. स्वामी यांच्या सहकार्याने आभाश्री क्लिनिक द्वारका नगरी विजापूर रोड येथे दर महिन्याच्या पुष्य नक्षत्र दिवशी मोफत सुवर्ण बिंदू प्राशन हे परमनंट ऍक्टिव्हिटी अर्थात कायमस्वरूपी प्रकल्प चे आयोजन करण्यात आले आहे.
या कायमस्वरूपी प्रकल्पाचे उद्घाटन उपप्रांतपाल-2 ला. ॲड. एम. के. पाटील सर क्लब अध्यक्ष लायन इंजि. सागर पुकळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले उद्घाटन नंतर पहिल्याच वेळेस 82 जणांनी या सुविधेचा लाभ घेतला.
आपल्या प्रास्ताविक अध्यक्ष भाषणात बोलताना ला. सागर पुकाळे यांनी म्हणाले की सध्याच्या परिस्थितीत प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलाच्या आरोग्याबाबत चिंता वाटत आहे त्याचे फक्त रोगप्रतिकारक शक्ती नाही तर बुद्धी देखील वाढावी यासाठी प्रत्येक जन प्रयत्न करीत आहेत आजच्या स्पर्धात्मक युगात आपली मुले टिकून राहणे आवश्यक आहे त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आईवडिलांसाठी काश्यप ऋषी नी हजारो वर्षापूर्वी आयुर्वेदात सांगितलेले 🩸 सुवर्ण बिंदू प्राशन ही समाजातील काळाची गरज लक्षात घेऊन आम्ही हा उपक्रम सुरू केला असल्याचे सांगितले तर आपल्या उद्घाटन भाषणात बोलताना ला. अॕड. एम के पाटील सर म्हणाले की लायन्स क्लब ऑफ सोलापूर ट्विन सिटी ने ह्या वर्षी मोठी भरारी घेतली असून ह्या चालू वर्षातील तीन महिन्या मध्येच चिल्ड्रन पार्क, व्हिजन सेंटर व त्यानंतर ही मोफत सुवर्ण बिंदू प्राशन केंद्र अशी तीनही त्यांची समाज उपयोगी मोठी परमनंट ऍक्टिव्हिटी खरोखर कौतुकास्पद आहे.
गेले तीन चार वर्ष झाले सागर पुकाळे यांचे कार्य पाहतो सतत काही नवीन काही ना काही संकल्पना राबवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो काही तरी नवीन करून दाखवण्याची त्यांची नेहमीच जिद्द असते असे म्हणत त्यांनी अध्यक्ष ला इंजि. सागर पुकाळे यांचा सह क्लब ने करत असलेल्या कार्याचे कौतुक करून शाब्बासकीची थाप दिली .
यावेळेस सचिव ला. इंजि. रविकिरण वायचळ खजिनदार ला. राजेश परसगोंड, ला. ममता बुगडे ला. नागेश बुगडे ला. ज्ञानेश्वर कुलकर्णी, भाऊसाहेब माने आभाश्री क्लिनिकचे डॉ. एम. एस. स्वामी डॉ. शिवानी स्वामी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.