सोलापूर प्रतिनिधी
आगामी महानगरपालिका ,नगरपालिका ,जिल्हा परिषद ,पंचायत समिती या निवडणुकांच्या तयारीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या उपस्थितीत आज सोलापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका ताकतीने लढवण्याचे ठरवण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर ,जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे,लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे ,शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख ,विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अमर कुलकर्णी ,उपजिल्हा अध्यक्ष सत्तार सय्यद , सुभाष माने , निलेश भंडारे , रविराज शिंदे ,गोविंद बंदपट्टे ,जितू टेंभुर्णीकर, मोहोळ तालुका अध्यक्ष एडवोकेट कैलास खडके ,अक्कलकोटचे तालुकाध्यक्ष मल्लिनाथ पाटील ,विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब सरोदे ,राहुल पाटील, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष जयश्री ताई हिरेमठ, सौ शोभा साठे ,पवन देसाई ,समर्थ ओझा, मनोज बचुटे ,शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष महादेव मांढरे,श्रीधर गुडेली, किरण किरात,इत्यादी उपस्थित होते.