पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर येथील के बी पी महाविद्यालया मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३५ व्या जयंती निमित्त माजी विद्यार्थी कार्यकारणी सदस्य व युवा राष्ट्र चेतना चे संपादक जैनुद्दीन मुलाणी यांच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनिय कार्याबदल त्यांचा सत्कार जेष्ठ विचारवंत इंद्रजीत देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी संस्थेचे माजी सचिव प्रा डॉ. जे जी जाधव प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यशवंतच्या मुख्याध्यापिका अनिता साळवे माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष वसंतराव देशमुख, प्रा आर डी पवार, प्रा डॉ डी जी साळुखे, डॉ.राजेद्र जाधव, प्रा नानासाहेब लिगाडे उप प्राचार्या डॉ. लतिका बागल उप प्राचार्य प्रा चांगदेव कांबळे, जनरल बॉडी सदस्य अमरजित पाटील गणेश पाटील स्थानिक स्कूल कमिटीचे जेष्ठ सदस्य आबासाहेब सोनवणे यांच्या सह मान्यवर उपस्थित होते