सोलापूर प्रतिनिधी
आमदार प्रणिती शिंदे यांच्या आमदार निधीतून विनोबा भावे झोपडपट्टी येथे ओंकार नवरात्र महोत्सव तरुण मंडळ सामाजिक सभागृहाचे लोकार्पण कार्यक्रम संपन्न झाला.
प्रभाग क्रमांक 9 विनोबा भावे झोपडपट्टी येथे ओंकार नवरात्र महोत्सव तरूण मंडळाच्या मागणीनुसार सामाजिक सभागृहासाठी आमदार प्रणिती शिंदे यांनी आमदार निधीतून दहा लाख रुपये बजेट मंजूर केले. त्या बजेट मधून सामाजिक सभागृह बांधण्यात आले होते. त्याचा लोकार्पण आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी ओंकार नवरात्र महोत्सव मंडळाचे पदाधिकारी नितीन बिच्चल, विठ्ठल नल्ला, मा. परिवहन समिती सदस्य तिरुपती परकीपंडला, NSUI शहर अध्यक्ष सुमीत गडगी, बुगप्पा गणप्पा, भूमय्या गाजुल, नागेश बर्रेकंल, नागेश म्याकल, विनायक वंगारी, यांच्यासह त्या भागातील नागरिक बंधुभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.