पंढरपूर तालुक्यातील भाळवणी जिल्हा परिषद व पंचायत समिती गटातील नागरिकांना मेगा लसीकरणाचे आयोजन करण्यात आले असून या लसीकरणात सर्वांनी सहभागी व्हावे असे आव्हान पंचायत समिती सदस्य संभाजी शिंदे यांनी केले आहे.
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती गटांमधील गावामध्ये रुग्ण संख्या वाढत आहे या अनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे मेगा लसीची मागणी करण्यात आली होती.
यास अनुसरून उद्या शुक्रवार 17 /09/2021 रोजी करण्याचे आयोजन संबंधित उपकेंद्रात आयोजन करण्यात आलेले असून नागरिकांनी लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन आपले गाव कोरोना मुक्त करावा,असे शिंदे यांनी सांगितले आहे.