संग्रामनगर प्रतिनिधी केदार लोहकरे तेज न्यूज
जैन सोशल ग्रुप अकलूज अंतर्गत कार्यरत असलेल्या संगिनी फोरम अकलूजचा पदग्रहण व शपथविधी सोहळा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र रिजनचे पीआरओ ॲडमिन राजेश संघवी व संगिनी फोरमच्या महाराष्ट्र रिजनच्या कमिटी कन्व्हेनर नमिता शहा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नूतन कार्यकारिणीचा शपथविधी संपन्न झाला.यावेळी भक्ती वैद्य यांनी अध्यक्षा तर अर्पिता गांधी यांनी सचिव म्हणून शपथ घेतली तसेच उपाध्यक्षा भाग्यश्री फडे, खजिनदार मनाली गांधी,प्रणाली फडे व कार्यकारिणी सदस्यांनीही पदभार स्वीकारला.
जैन सोशल ग्रुप अकलूजचे अध्यक्ष सीए अमित दोशी यांनी स्वागत करून संस्थेच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती प्रमुख पाहुण्यांना दिली व नूतन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.
यावेळी सीए शशील गांधी यांनी गुंतवणूक,बचत व आर्थिक नियोजन यावर मार्गदर्शन केले. तसेच राहुल झांबरे यांनी सोजर मूकबधिर निवासी शाळा,भूम (जि. धाराशिव) येथील विद्यार्थ्यांच्या गरजांची माहिती दिली.या उपक्रमास प्रतिसाद देत संगिनी फोरमच्या नूतन अध्यक्षा भक्ती वैद्य यांनी मूकबधिर निवासी शाळा भूम विद्यालयातील विद्यार्थांसाठी चार कर्णयंत्रे (Hearing Aids) भेट देऊन सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला.प्रमुख पाहुण्यांनी जैन सोशल ग्रुप व संगिनी फोरमच्या सेवाभावी आणि महिला सक्षमीकरणाच्या कार्याचे कौतुक करत नूतन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.सेवा,संस्कार आणि संघटन या मूल्यांवर आधारित समाजोपयोगी उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन त्यांनी केले.या कार्यक्रमासाठी कार्यकारिणी सदस्य सौ.प्राची चंकेश्वरा,सौ.मेघना फडे,व सौ.कोमल व्होरा,सौ.श्रुती फडे उपस्थित होत्या तसेच अकलूज परिसरातील विविध सामाजिक,शैक्षणिक व सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री फडे,सेजल दोशी आणि स्वराली फडे यांनी केले.शेवटी गौरव फडे यांनी आभार मानले.


