भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम प्रतिनिधी तेज न्यूज
मुंबईकरानों पावसाळ्यात सावधानता बाळगणे अत्यंत आवश्यक आहे.असे आवाहन मुंबई कांदिवली पश्चिम येथील जेष्ठ पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांनी मुंबईकरांना केलेले आहे.सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने झाडे पडणे, इमारती किंवा भिंती पडणे, गटाराच्या पाण्यात पडून दुर्घटना घडणे,विज कोसळणे,विजेचा शॉक लागून दुर्घटना होणे, गटाराच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे गटारात पडून वाहून जाण्याच्या दुर्घटना घडणे.या सारख्या निसर्ग व मानव निर्मित आपत्ती येऊन मालमत्ता व जीवित हानी होऊ शकते.
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच झाडे पडून, गटाराच्या पाण्यात वाहून जाऊन, अनेक ठिकाणी भिंती कोसळून दुर्घटना शाळेच्या बसवर झाड कोसळून विद्यार्थ्यांचा मृत्यू,घडल्याच्या घटना ताज्या आहेत.मॅनहोल मध्ये पडून एक इसम ठार झाला,अशा घटना घडल्या आहेत.लहान थोरांनी रस्त्यांवरुन चालताना पावसाच्या पाण्याचा अंदाज घेऊन सावधानता बाळगावी, झाडाखाली उभे राहू नये, गटाराच्या तुटक्या फुटक्या झाकणावर पाय न ठेवता बाजूने सुरक्षित ठिकाणाहून जावे यावे, असे आवाहन जेष्ठ पत्रकार,साहित्यिक, गीतकार, सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांनी केले आहे.


