मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे तेज न्यूज
पालकमंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या "पालकमंत्री प्रवास" या उपक्रमांतर्गत वस्ती विभागातील विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी नागरिकांना थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली.
यावेळी दीपक खानविलकर यांनी पालकमंत्र्यांची भेट घेऊन जोगेश्वरी परिसरातील शैक्षणिक समस्या,पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता तसेच इतर नागरी सुविधांशी संबंधित विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच या समस्यांच्या निराकरणासाठी निवेदनही सादर करण्यात आले.
या प्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष ज्ञानमूर्ती शर्मा तसेच मुंबई भाजपचे महामंत्री पवन त्रिपाठी जी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत संबंधित विभागांमार्फत त्यांचे तातडीने निराकरण करण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली.
हा उपक्रम नागरिक आणि प्रशासन यांच्यातील संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला असून स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


