पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
दिनांक 09 मे 2026 रोजी पंढरपूर तालुका पोलिसांनी आगामी यात्रा सण उत्सव च्या अनुषंगाने पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मौजे पोहोरगाव शेगाव या ठिकाणी अवैध दारू साठ्यावर रेड करून एकूण 15200 रुपयांचा देशी-विदेशी दारू साठा जप्त केलेला आहे.
याबाबत पंढरपूर तालुका पोलिसांनी आरोपीं नावे बंडू यासीन सय्यद वय 52 वर्षे राहणार पोहोरगाव याचे विरुद्ध व आरोपी नामे नरेश सुरेश दुध्दम वय 40 वर्षे राहणार शेगाव याचे विरुद्ध मुंबई दारूबंदी कलम 65 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर,सहाय्यक पोलीस निरीक्षक शहाजी गोसावी, पोलीस उपनिरीक्षक विक्रम वाढणे, आबासाहेब शेंडगे, पोलीस हवालदार गावडे, पोलीस हवालदार सुजित उबाळे, सुभाष देशमुख, दीपक भोसले,पोलीस कॉन्स्टेबल संजय गुटाळ यांच्या पथकाने केली आहे.


