बारामती प्रतिनिधी तेज न्यूज
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करा भारतीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एमडी शेख यांची मागणी करण्यात आली आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा बारामतीकरांसह संपूर्ण महाराष्ट्र व्यक्त करत आहे. याबाबत भारतीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष हाजी एम.डी. शेख यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.
बारामतीकरांचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे की, ही जागा बिनविरोध निवडून द्यावी. यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना बिनविरोध निवडून देण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे. भारतीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी एम.डी. शेख यांनी स्पष्ट केले की, जर सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसने उमेदवार जाहीर केला तर यापुढे महाराष्ट्रात होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये भारतीय काँग्रेस पक्ष उमेदवार देणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
शेख यांनी पुढे म्हटले, की “सुनेत्रा पवार यांना बारामतीतून बिनविरोध निवडून यायलाच हवे. याचा अर्थ दादांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण केल्यासारखे होईल.”सध्या बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चा तीव्र झाली आहे.
सुनेत्रा पवार यांना बिनविरोध निवड मिळावी की निवडणूक चुरशीची होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

