अकलूज प्रतिनिधी तेज न्यूज
अकलुज येथे आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आणि अत्याधुनिक सुविधा असलेल्या साई टीव्हीएस या भव्य टू-व्हीलर शोरूमचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते उत्साहात पार पडले. दुचाकी वाहनांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेले हे शोरूम अकलुज आणि परिसरातील ग्राहकांसाठी महत्त्वाचे ठरणार असून येथे अत्याधुनिक इलेक्ट्रिक तसेच पेट्रोल दुचाकी वाहनांची मोठी श्रेणी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अकलुज येथील इंदापूर रोडवर उभारण्यात आलेल्या साई टीव्हीएस या नूतन शोरूमचे उद्घाटन दिनांक १० मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता मोठ्या थाटामाटात पार पडले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून धैर्यशील मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील, राजन पाटील, रोहन देशमुख, राजा माने, शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्यासह TVS Motor Company चे प्रतिनिधी ईशान लंभाटे, अझहर चौधरी, संतोष ठोंबरे, जनार्दन कादे, डॉ. संदेश कादे, युवराज कादे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते फीत कापून शोरूमचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले.
साई टीव्हीएस शोरूममध्ये ग्राहकांसाठी नवीन मॉडेल्सची इलेक्ट्रिक व पेट्रोल दुचाकी वाहने, आधुनिक डिझाईन, उत्तम मायलेज आणि उत्कृष्ट परफॉर्मन्स असलेली वाहने उपलब्ध करण्यात आली आहेत. ग्राहकांना वाहन खरेदीसाठी सुलभ कर्जसुविधा, आकर्षक सवलती तसेच दर्जेदार स्पेअर पार्ट्स आणि सर्व्हिसिंग सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
उद्घाटन सोहळ्यास परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ, विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्राहकांना उत्कृष्ट विक्री सेवा आणि विश्वासार्ह पश्चात सेवा देण्याचे उद्दिष्ट ठेवून हे शोरूम कार्यरत राहील, असा विश्वास आयोजक युवराज कादे यांनी व्यक्त केला.


