रामरायांच्या आचरणाने आणि श्रीकृष्ण परमात्म्याचा उच्चारणाने जीवन सुखी होणार :- शांतीलाल महाराज आवटे
करकंब प्रतिनिधी तेज न्यूज
जळोली येथे सद्गुरू कालेकर महाराज यांचे कृपाशीर्वादाने गेल्या ३० वर्षांपासून अव्याहतपणे चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची आज ह. भ.प. शांतीलाल महाराज आवटे यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली दररोज पहाटे काकडआरती, श्री संत तुकाराम गाथा भजन, प्रवचन, हरिकीर्तन,महाप्रसाद आणि जागर यासाठी हजारो भाविक भक्त दररोज उपस्थित होते.
यावेळी श्री शांतीलाल महाराज यांनी काल्याचे कीर्तनासाठी संत तुकाराम महाराजांचा अभंग आनंत ब्रह्मांडे एके रोमी रोमी यावर अतिशय सुंदर चिंतन करीत असताना रामायणाचे आचरण करावे.आणि महाभारताचे श्रवण करावे. आणि आपले जीवन व्यतीत करावे असे सांगत कृष्णाने प्रत्यक्षपणे आपल्या आईला गोपिकांना प्रत्यक्ष ब्रह्मांड दाखवून आपल्या अनेक लीला दाखवत दृष्टांचा संहार केला यमुने तीरी अनेक गोपिकांसमवेत खेळ खेळत गोकुळ नगरी आनंदमय केली. आपला प्रपंच सुखी करायचा असेल तर अध्यात्म हीच एकमेव शक्ती आहे की आपला संसार सुखी करू शकतो संतांनी जे सांगितलं त्या बोधवचनांच आपण आचरण केलं तर आपला संसार सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. हे सांगत दहीहंडी फोडून काल्याच्या कीर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली.
यावेळी जळोली आणि जळोली पंचक्रोशीतील हजारो भक्त भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेत अध्यात्मिक विचारांची मेजवानी सर्व जळोलीकरांना मिळाली.
यावेळी सर्व आयोजन कमिटीने अधिक परिश्रम घेत सप्ताह यशस्वीपणे पार पाडला.


