मोहोळ प्रतिनिधी तेज न्यूज
राज्यस्तरीय आदर्श पुरस्काराने सुलोचना नंदकुमार पाटील तसेच देशभक्त संभाजीराव गरड महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.डॉ.नंदकुमार जगन्नाथ पाटील यांचा गौरव करण्यात आला.
साऊ ज्योती सामाजिक संस्था व श्लोक फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार सोहळा २०२६ मध्ये समर्थ नगर, मोहोळ (जि. सोलापूर) येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. सुलोचना नंदकुमार पाटील यांना राज्यमाता जिजाऊ माँ साहेब आदर्श समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. तर राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम पुरस्कृत प्राचार्य. नंदकुमार पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श प्राचार्य पुरस्कार प्रधान करण्यात आला
हा पुरस्कार २६ जानेवारी २०२६ रोजी घोषित करण्यात आला असून, त्याचे वितरण ८ फेब्रुवारी २०२६ रोजी पुणे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात आला.
सुलोचना पाटील यांनी समाजसेवा, महिला सक्षमीकरण, सामाजिक जाणीव , विधवा सन्मान व प्रेरणादायी उपक्रमांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण कार्य केले आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेकांना नवी दिशा व प्रेरणा मिळाली असून, त्यांच्या योगदानाची दखल घेत हा राज्यस्तरीय सन्मान देण्यात आला.
पुरस्कार स्वीकारताना सुलोचना पाटील यांनी हा सन्मान संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे नमूद करत, भविष्यातही सामाजिक बांधिलकी जपत कार्य सुरू ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला.
या सोहळ्यास विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

