कासेगाव प्रतिनिधी तेज न्यूज
कासेगाव शिक्षण संस्थेच्या राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी कासेगाव च्या १३ विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय कंपनीत निवड झाली. गांधीनगर गुजरात येथील Advantmed इंडिया या आंतरराष्ट्रीय कंपनीसाठी जुनिअर मेडिकल कोडर या पदासाठी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाकडून मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या.
महाविद्यालयात डी. फार्मसी, बी. फार्मसी, एम. फार्मसी व पी. एच. डी. हे अभ्यासक्रम शिकवले जातात व अशा प्रकारच्या मुलाखती दरवर्षी आयोजित केल्या जातात. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस के मोहिते यांनी दिली. सदर विद्यार्थी बी फार्मसी अंतिम वर्षात शिकत होते. विद्यार्थ्यांना अगस्त्य मेडिकल कोडींग इन्स्टिटयूट च्या श्री. निलेश पाटील यांनी मार्गदर्शन केले.
यात अभिषेक पाटील, आरोही जाधव, कोमल माळी, साक्षी कदम, प्रतीक पाटील, सोनम गायकवाड, ओंकार पाटणे, अक्षय भुरके, श्रेया मिसाळ, शगुप्ता सनदी, प्रणाली सावंत, प्रतीक पाटील आणि स्नेहा पाटील यांचा समावेश आहे. बी. फार्म. अंतिम वर्षाचा निकाल लागण्यापूर्वीच वार्षिक रु. तीन लाखाहून अधिक पगाराची नोकरी मिळाल्याबद्दल विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे आभार मानले.
ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाकडून विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास, इंग्रजी संभाषण कौशल्याबद्दल कार्यशाळा, टेक्निकल इंटरव्ह्यू, मुलाखत कौशल्य याविषयी विशेष मार्गदर्शन केले जाते.
ग्रामीण भागातील सर्वात जास्त प्लेसमेंट देणारे महाविद्यालय अशी महाविद्यालयाची ओळख निर्माण झाली आहे. ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर डॉ. एम. एम. नितळीकर, डॉ. जी. एच. वाडकर यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या निवडीबद्दल कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य आर. डी. सावंत यांनी अभिनंदन केले.