पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागात दिनांक १५ जुलै २०२५ रोजी बी. टेकच्या द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ओरिएंटेशन व स्वागत सत्राचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
या कार्यक्रमात विभागप्रमुख डॉ. एस. व्ही. पिंगळे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करत त्यांना विभागाच्या शैक्षणिक, तांत्रिक आणि व्यावसायिक उपक्रमांची सखोल माहिती दिली. त्यांनी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक अभ्यासक्रम, आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विभागात चालवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबद्दल मार्गदर्शन केले.
दरम्यान डॉ. एस. व्ही. पिंगळे यांनी NEP 2020 अन्वये नव्याने लागू झालेला अभ्यासक्रम व त्याचे फायदे, विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यांचा विकास करणारे कोडिंग क्लब, टेक्निकल वर्कशॉप्स व सेमिनार्स,संशोधन प्रकल्प, स्टार्टअप संधी आणि इनोव्हेशन साठी असलेल्या प्लॅटफॉर्म्स,करिअर गाईडन्स, प्लेसमेंट ट्रेनिंग आणि इंटर्नशिप संधी, विभागामार्फत राबवण्यात येणारे सामाजिक व औद्योगिक उपक्रम याबद्दल माहिती सांगितली.या ओरिएंटेशन सत्राचा एकूण १४० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. विद्यार्थी खूपच प्रेरित व उत्साही दिसून आले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी ओरिएंटेशन समन्वयक प्रा. उदय फुले यांनी उपस्थित विद्यार्थी, शिक्षक व महाविद्यालयीन व्यवस्थापनाचे आभार मानले. विभागातर्फे सर्व विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक स्वागत करण्यात आले आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. हा कार्यक्रम पार पाडण्याकरीता विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.