सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रल च्या वतीने आंतरराष्ट्रीय न्याय दिनानिमित्त अध्यक्ष लायन प्रा.स्वामीनाथ कलशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर जिल्हा न्यायालयातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व वरिष्ठ विधी तज्ञ यांचा सन्मान व सत्कार सोहळा लायन्स क्लब सोलापूर सेंट्रलचे धडाडीचे अध्यक्ष प्रा स्वामीनाथ कलशेट्टी यांच्या शुभहस्ते जे विधिज्ञ पक्षकार साठी कष्ट करून न्याय मिळवून देतात अशा ज्येष्ठ आणि सदस्य विधीज यांचा सन्मान करण्यात आला
सोलापूर जिल्हा न्यायालयातील ज्येष्ठ विधीज्ञ सोलापूर वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड.विश्वनाथ आळंगे व तसेच सोलापूर वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड.रियाज शेख व सोलापूर वकील संघाचे माजी सचिव व लायन्सचे रिजन चेअरमन ॲड.श्रीनिवास कटकुर व सोलापूर वकील संघाचे माजी उपाध्यक्ष ॲड.असीम बांगी व सोलापुरातील युवा विधीज्ञ ॲड. सचिन रामपुरे व ॲड.आकाश आयंची या विधीज्ञांचा बुके व मोत्याची माळ घालून सन्मान करण्यात आला.याप्रसंगी ॲड.आळंगे साहेब व इतर ॲडव्होकेट आपले मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षपदावरून बोलताना लायन प्रा.स्वामीनाथ कलशेट्टी यांनी आंतरराष्ट्रीय न्याय दिनानिमित्त विधी तज्ञाच्या उत्तम कार्याची प्रशंशाकरित या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ॲडव्होकेट वर्गांचा कौतुक कौतुक त्यांना करून शुभेच्छा दिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.श्रीनिवास कटकुर व आभार लायन प्रा स्वामीनाथ कलशेट्टी यांनी मानले.क्लब मधील इतर सदस्यांचे या कामी बहुमोल सहकार्य लाभले