डोंबिवली प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर तेज न्यूज
जनतेच्या समस्यांना प्राधान्य देऊन, त्या वेळीच सोडविणे, नागरीकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करणे दक्ष नागरिक म्हणून देशासाठी काम करणे,हे आपले आद्य कर्तव्य आहे असे समजून गेली ३४वर्षे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकीच्या सेवेत असलेल्या निष्कलंक, प्रामाणिक, कर्तव्य तत्पर अधिकारी उप अभियंता श्री.विजकुमार विसपुते यांचा सेवा निवृत्ती पुर्व संध्येला नेहरु रोड बचाव संघर्ष समितीच्या वतीने नुकताच त्यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला.
डोंबिवली सारस्वत काॅलनी येथे हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.डोंबिवली भूषण, पद्मश्री सन्मानिय श्री.गजानन माने यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी महापालिका कार्यकारी अभियंता मनोज सांगवे,,त्यांचे सहकारी अवधूत मदन आणि नाख्ये उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.शिंदे यांनी केले व आभार प्रदर्शन सौ.मृदुला कुलकर्णी यांनी केले.यावेळी श्री.प्रभाकरन, इंगवले,जंगम,निषाद पाटील, श्रीपाद कुलकर्णी,सौ.श्रुती उरणकर आणि इतर महिला व जेष्ठ नागरिक उपस्थित होते.