पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
आषाढी यात्रा मुख्य सोहळा 06 जुलै 2025 रोजी संपन्न झाला. यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपूर शहरात लाखोंच्या संख्येने भाविक आले होते. यात्रा कालावधीत चंद्रभागा वाळवंट परिसरातही भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. येणाऱ्या भाविकांसाठी चंद्रभागा वाळवंट परिसर स्वच्छ असावा यासाठी पंढरपूर शहर पोलीस अधिकारी -कर्मचारी व आर्ट ऑफ लिव्हिंगचे महिला व पुरुष साधक तसेच नगरपालिका अधिकारी कर्मचारी यांच्याकडून चंद्रभागा वाळवंटपरिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
यात्रा कालावधीत वाळवंट परिसरात भाविकांची गर्दी मोठया प्रमाणात होत असल्याने सदर परिसरात सामाजिक बांधिलकी निर्माण व्हावी याकरिता जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर यांच्या सुचनेनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ अर्जुन भोसले, तसेच पंढरपुर शहर पोलीस ठाणेचे अधिकारी व अंमलदार यांनी दिनांक 20 जुलै 2025 रोजी वाळवंट परिसरात आर्ट ऑफ लिव्हींग धाराशिव संस्थेचे नंदु भैय्या तांबडे तसेच पुरुष व महिला साधक त्याचबरोबर पंढरपुर नगरपालिकाचे अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्रित येवुन वाळवंट परिसरातील मोठया प्रमाणात कचरा गोळा करून स्वच्छता मोहिम राबविली.