पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनियरींग. कोर्टी येथील प्राध्यापकांचे बेंथम सायन्स, सिंगापूर प्रकाशनाकडून प्रकाशित झालेल्या "थिन फिल्म नॅनोमटेरियल्स : सिन्थेसिस, प्रॉपर्टीज अँड इनोवेटिव्ह एनर्जी ॲप्लीकेशन्स " या स्कोपस इंडेक्स पुस्तकाचे प्रकाशन सोलापूर विदयापीठाचे कुलगुरु डॉ. प्रकाश महानवर, तारापाका विद्यापीठ चिली चे प्रा. डॉ. एडुआर्दो गॅल्वेझ सोटो, झागाझीग विद्यापीठ इजिप्तचे प्रा. डॉ. एम. ए. तौफिक यांच्या हस्ते झाले असल्याची माहिती महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
हे पुस्तक नॅनोमटेरियल्सच्या संश्लेषण, त्यांच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मांबरोबरच विविध ऊर्जा अनुप्रयोगांसाठीच्या नवीन संशोधनांवर प्रकाश टाकते. नॅनोतंत्रज्ञान हा आधुनिक विज्ञानाच्या प्रगत शाखांपैकी एक असून, ऊर्जा क्षेत्रात त्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे. या पुस्तकात थिन फिल्म नॅनोमटेरियल्सचे उत्पादन, त्यांचे विविध प्रकार, तसेच सौरऊर्जा, बॅटरी तंत्रज्ञान आणि इतर ऊर्जाक्षेत्रातील उपयोग याबद्दल सखोल माहिती दिली आहे.
स्कोपस इंडेक्सकडून पुस्तकात प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधन लेखनाची गुणवत्ता पडताळणी करुन स्कोपस इंडेक्सचा दर्जा दिला आहे. विशेष म्हणजे महाविदयालयातील हे सातवे पुस्तक स्कोपस इंडेक्स झालेले असल्यामुळे महाविदयालयात आनंदाचे वातावरण झाले आहे.
या पुस्तकाचे संपादक डॉ.संपत देशमुख, डॉ.विपुल खेराज(SVNIT,SURAT), डॉ.कैलाश करांडे, डॉ.स्वानंद कुलकर्णी यांनी नॅनोतंत्रज्ञान आणि ऊर्जा अनुप्रयोगांमधील संशोधनावर आधारित महत्त्वपूर्ण माहिती विद्यार्थ्यांसह संशोधक आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ज्ञांसाठी उपयुक्त ठरेल, असे सांगितले.
या पुस्तकाच्या स्कोपस इंडेक्स मानांकनमुळे थिन फिल्म नॅनोमटेरियल्स या विषयावर अधिक सखोल अभ्यास करता येणार असून, ऊर्जा क्षेत्रात नाविन्यपूर्ण संशोधनास चालना मिळेल, असा विश्वास वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या विशेष पुस्तकाचे संपादक म्हणून काम केल्याबद्दल समाजातील विविध मान्यवरांडकून संपादकास शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. तसेच महाविदयालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.