सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
शनिवार दि.21/6/2025 रोजी जागृत शनैश्वर देवस्थान कर्णिक नगर सोलापूर येथील शनैश्वराची आरती मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
आज सोलापूर शहरातील गुणवंत शुभम अल्ली ( BE) यांची स्पर्धा परीक्षेतून नागपूर महानगरपालिकेच्या नगर विभागात कनिष्ठ शाखा अभियंता म्हणून निवड झाले बद्दल विशेष सत्कार महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी स्पर्धा परीक्षेत राज्यात दुसरा क्रमांक मिळविलेल्या परिस सुरेश गायकवाड याच्या हस्ते सत्कार करण्यात आला.हा सत्कार शनैश्वर देवस्थान समितीचे वतीने आयोजित केला होता.त्याला सिव्हिल ॲडीक्टच्या माध्यमातून मार्गदर्शन लाभले आहे.
यावेळी देवस्थान समितीचे संस्थापक ॲड सुरेश गायकवाड, कार्या.अध्यक्ष. विश्वास शिंदे, सचिव ॲड.सुनिल क्षीरसागर, ॲड.युवराज आवताडे,जेष्ठ पत्रकार दशरथ वडतिले यल्लालिंग नगर सोसायटीचे अध्यक्ष प्रभाकर यादगिरी, नागेश उमराणी, राजशेखर चितली सर,कृष्णा शर्मा, शुभम वाखनिस, गणेश साळुंखे, मुजूहुददीन दारूवाला, आदी मान्यवर उपस्थित होते.