पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पहाटे चार वाजल्यापासून भीमा नदी पात्रात सुमारे 50 हजार क्युसेस इतके पाण्याचा प्रवाह वेगवेगळ्या बंधाऱ्यातून सोडण्यात आल्यामुळे पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील मुंडेवाडी हा पुल सुमारे चार फूट पाण्याखाली गेलेला आहे अजनसोड हा पूल सुमारे तीन फूट पाण्याखाली गेलेला आहे.
त्याचप्रमाणे जुना दगडी पूल सुमारे चार फूट पाण्याखाली गेलेला आहे सदर ठिकाणी ट्रॅफिकचे कर्मचारी नेमण्यात आलेले असून तिन्ही पुलावर्ती लोखंडी व बांबूची बॅरिगेटिंग करण्यात आलेली आहे.
तिन्ही पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेले असून कुठलीही दुर्घटना होऊ नये म्हणून सदर ठिकाणी ट्रॅफिकचे कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत.तसेच नागरिकांनी घरा बाहेर पडू नये.आणि वरील पूल ओलांडून पुढे जावे नये.अशी माहिती टी वाय मुजावर पोलीस निरीक्षक पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन यांनी दिली आहे.