सनराईज पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज शेळवे येथे आज इयत्ता दहावीच्या निरोप समारंभ संपन्न झाला
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
उपक्रमशील शिक्षक मोहन गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले,सुरुवातीला राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली,अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून प्रशालेच्या आठवणींना उजाळा दिला सर्व विद्यार्थ्यांना सुबक असे पॅड भेट म्हणून देण्यात आले,दिले तसेच विद्यार्थ्यांना,शिक्षकांना, कर्मचाऱ्यांना जेवणाची मेजवानी देण्यात आली, इयत्ता दहावीची ही बॅच म्हणजेच प्रशालेच्या स्थापनेपासून ची पहिली बॅच, या बॅच मधील विद्यार्थ्यांनी 5वी शिष्यवृत्ती, अनेक स्पर्धा परीक्षा यामध्ये प्रशालेचे नाव उज्ज्वल केले, इयत्ता पहिली पासून ते दहावीपर्यंत हे विद्यार्थी प्रशालेच्या सोबत आहेत सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे आशीर्वाद घेतले व परीक्षेस आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचे वचन दिले,तसेच प्रशालेसाठी ऑफिस टेबल भेट दिला.
सदर वर्गास अध्यापन केलेल्या सर्व शिक्षकांनी आपापल्या भावना व्यक्त केल्या,संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समाधान गाजरे, संस्थापक उपाध्यक्ष अजित लोकरे व संस्थापक सचिव अंकुश गाजरे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन परीक्षेस सामोरे जाण्यासाठी प्रेरणा आणि ऊर्जा दिली,प्रशालेच्या शिक्षिका सौ. गोरे यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली..!!