पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्रीसंत नामदेव शिंपी समाजाचे जेष्ठ समाजसेवक अनंत तुकाराम पतंगे (म्हेत्रे) यांचे शनिवार दि. 7 डिसेंबर रोजी सकाळी 8.15 वाजता वयाच्या 74 व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
कै. अनंता पतंगे हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे व शिंपी समाजाचा आधारवड होते. गेल्या 55 वर्षापासून त्यांनी अत्यंत निष्ठेने समाजाची सेवा केली आहे. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी समाजकार्य केले. शिंपी समाजाचे म्हेत्रे म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. समाज बांधवांच्या प्रत्येक सुख-दुःखाप्रसंगी सहभागी होवून ते हिरीरिने कार्य करत असत. सर्व समाज बांधवांशी त्यांचे आपुलकीचे नाते निर्माण झाले होते. त्यांच्या जाण्याने शिंपी समाजाचा आधारवड हरपल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.
कै. अनंता पतंगे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे. गोपाळपूर रोडवरील वैकुंश स्मशानभूमीत कै. अनंता पतंगे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संत नामदेव महाराजांचे वंशज ह.भ.प. नामदास महाराज परिवार, संत नामदेव शिंपी समाजाचे विश्वस्त, समाज बांधव, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.