सामाजिक , शैक्षणिक , आर्थिक बरोबरच महिलांची आरोग्य जागृती देखील महत्त्वाची : प्रा .मिनाक्षी अमोल जगदाळे
माळशिरस तालुका प्रतिनिधि जयराम घाडगे
मकरसंक्रांत झाली म्हणजे महिलांना वेध लागतात ते हळदीकुंकू कार्यक्रमाचे. म्हणूनच यानिमित्त जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा कार्याध्यक्षा , महिला चळवळीत नेहमी अग्रेसर असणाऱ्या व महिलांसाठी नेहमी वेगवेगळे उपक्रम राबविणा्रया प्राध्यापक सौ. मीनाक्षी अमोल जगदाळे मॅडम यांनी त्यांच्या राहत्या घरी जिजाऊ ब्रिगेडच्या सर्व महिला व परिसरातील सर्व महिला मंडळी यांना त्यांच्या घरी हळदी कुंकवाचे निमंत्रण देऊन आग्रह पूर्वक बोलविले. सर्व महिला एकत्र आल्यानंतर हळदी कुंकू कार्यक्रम व वान लुटल्यानंतर त्याच ठिकाणी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून निमा वुमन्स फोरमच्या अध्यक्षा डॉ. सौ. अंजली कदम व उपाध्यक्षा. सौ. अर्चना गवळी यांचे महिलांच्या आरोग्याविषयी व्याख्यान ठेवले.
डॉ. कदम मॅडम यांनी महिलांचे आधुनिक जीवनशैली, आहार तसेच महिलांच्या निर्माण होणाऱ्या समस्या, शारीरिक आजार, प्रौढ अवस्थेतील महिलांच्या समस्या, उतार वयातील समस्या, व्यंग व त्यावरील उपचार याविषयी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर डॉक्टर गवळी मॅडम यांनी महिलांना आहार विहार , आहारातील वेगवेगळे जीवनसत्वे यांचे महत्त्व व ते कोणत्या पदार्थात मिळतात याविषयी सखोल मार्गदर्शन केले. त्याचबरोबर शरीराला आवश्यक असणाऱ् वेगवेगळ्या वॅक्सिन विषयी मार्गदर्शन केले.
डॉक्टर अर्चना गवळी या मिसेस महाराष्ट्र मेडिक्विन व मिसेस आशिया इंटरनॅशनल गोल्ड मेडल विजेत्या आहेत. वरील उपक्रमाचे प्रा.सौ जगदाळे मॅडम यांनी आयोजन केल्याबद्दल व फक्त वाणच न लुटता व नुसते तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे न म्हणता प्रत्यक्षात महिलांना आवश्यक असणाऱ्या माहितीचा खजिनाच लुटण्याचा आनंद दिला.
यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या वैचारिक मेजवानीचा व समाजातील विधवा महिला भगिनींनाही हळदीकुंकवाचा मान देण्यात आला . या वेळी प्रस्ताविकात सौ जगदाळे म्हणाल्या महिलांनी सामाजिक , शैक्षणिक , आर्थिक बरोबरच आरोग्य विषयक जागरूक झाले पाहिजे , महिला स्वतःकडे लक्ष देत नाहीत पण महिला सशक्त तर कुटुंब सशक्त .त्याचबरोबर उपस्थित सर्व महिलांना जिजाऊ ब्रिगेडची विचारधारा याबद्दलचे वैचारिक पुस्तक व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले .नाश्ता देण्यात आला .वरील उपक्रमामुळे सर्व महिला यांनी आनंदित होऊन डॉ.कदम मॅडम, डॉ. गवळी मॅडम व प्रा. जगदाळे मॅडम यांचे कौतुक करून आभार मानले.
यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या महिला पदाधिकारी सौ. पुनम सुसलादे,सौ.कल्पना चव्हाण, सौ. शारदा चव्हाण , सौ. सुवर्णा क्षीरसागर , आशा सावंत ,मार्गदर्शक सौ.विनोदीनी अंधारे सर्व महिला सदस्या व परिसरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
जिजाऊ ब्रिगेड आणि निमा वुमेन्स फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने खूप छान कार्यक्रम झाला , महिलांना हळदीकुंकूबरोबरच वैचारिक मेजवानी मिळाली.