पुणे प्रतिनिधी
भारतातील मानाच्या कुस्ती स्पर्धेत तेलंगाना येथे झालेल्या स्पर्धेत हिंदकेसरीची गदा महाराष्ट्रातील पैलवान समाधान वाघमोडे पाटील यांनी पटकावली. सोलापूर जिल्हातील समाधान वाघमोडे पाटील २०२४ चा हिंदी केसरी ठरला आहे. हिंदकेसरी समाधान वाघमोडे पाटील यांना पस्तीस सदोतीस ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन सन्मान केला.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुका नजीक पिंपरी येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या समाधान पाटील यांनी हिंदकेसरी किताब पाठविला. तेलंगणा येथे झालेल्या स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्रने विजेतेपद पटकवले आहे. २०२३ मध्ये झालेल्या स्पर्धेत अभिजीत कटके हिंदकेसरी ठरला होता, त्याने हरियाणाचा पैलवान सोमवीर याचा पराभव केला होता.
यंदा झालेला हिंदकेसरी स्पर्धेत समाधान वाघमोडे पाटील यांनी बाजी मारली आहे. यंदा झालेल्या हिंदकेसरी २०२४ पै समाधान वाघमोडे पाटील यांना भेटून छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सुदाम तळेकर, संदीप झोटे, अभिषेक राठोड, भगत मोहिते, अनिल कांबळे, अमोल वाघमोडे आदी मान्यवर उपस्थित होते.