सोलापूर प्रतिनिधी
३१ ऑक्टोबर राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त स्टॅच्यु ऑफ युनिटी गुजरात येथे एकूण सीआरपीएफचे १२० अधिकारी बुलेटवरून ही रॅली पुर्ण करणार आहेत. ही रॅली कन्याकुमारी पासून ते गुजरातपर्यंत असणार आहे . गुरवार दि.१९ ऑक्टोबर रोजी केगाव येथील सिंहगड महविद्यालयात ह्या रॅलीचे स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी श्री राकेश कुमार डीआयजीपी, श्री सुनील कुमार डेप्युटी कमांडंट, श्रीमती सुमा डेप्युटी कमांडंट, श्रीमती सिंधू डेप्युटी कमांडंट,श्रीमती अशिना असिस्टंट कमांडंट, श्री संजय कदम , असिस्टंट कमांडंट , सिंहगड संस्थेचे सहसचिव संजय नवले, सिंहगड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले, सिंहगड पब्लिक स्कूलच्या प्राचार्या निखत शेख, उपप्राचार्य प्रकाश नवले, इस्टेट मॅनेजर डॉ. दत्तात्रय नवले व कॅम्पस मधील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी सीआरपीएफबद्दल व एकात्मता रॅलीचा उद्देश , सीआरपीएफ चे कार्य याबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. तसेच राष्ट्रीय एकात्मतेचे महत्व देखील यावेळी स्पष्ट केले.संरक्षण क्षेत्रात अभियंत्यांना देखील मुबलक संधी उपलब्ध असून देशसेवेसाठी योगदान देण्याची संधीदेखील आपल्याला मिळू शकते असे विशद केले.