शेळवे प्रतिनिधी
दि.२१ ऑक्टोबर शेळवे येथील सनराईज पब्लिक स्कूल येथे होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम सांगोला-पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील व त्यांच्या सौभाग्यवती रेखाताई शहाजी बापू पाटील तसेच चिरंजीव युवा नेतृत्व दिग्विजय दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये अतिशय उत्साहात संपन्न झाला, आमदार शहाजी बापू पाटील यांनी आपल्या मनोगतातून ग्रामीण भागातील स्वयंपूर्ण शाळा म्हणून सनराईज प्रशालेचे कौतुक केले,तसेच भविष्यकाळात प्रशालेसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे अभिवचन दिले, त्यांच्या खास शैलीमध्ये "काय ती सनराईज शाळा, काय ते विद्यार्थी, काय निसर्गरम्य वातावरण सगळं कसं ओक्के मध्ये आहे," हा डायलॉग म्हणून सनराईज परिवार व प्रशालेला ऊर्जा दिली, सदर स्पर्धेसाठी पहिल्या टप्प्यात दोनशे महिलांनी नाव नोंदणी केली व त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये अजून शंभर महिलांनी सहभाग नोंदवला, एकूण तीनशे महिलांनी नाव नोंदणी करून उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला,महिलांच्या विक्रमी प्रतिसादामुळे विजेते स्पर्धक घोषित होण्यासाठी तब्बल सायंकाळी सहा वाजेपर्यंत वाट पहावी लागली, मात्र स्पर्धेतील रंगत, महिलांमधील उत्साह व मनोरंजनामध्ये तसूभर ही फरक पडला नाही;तब्बल एक हजारहून अधिक महिला, पुरुष आणि विध्यार्थी यांनी या मनोरंजक स्पर्धेचा आनंद लुटला,सदर स्पर्धेतील या वर्षीच्या पैठणीच्या मानकरी ठरल्या त्या शेळवे येथील महिला-भगिनी सौ.सुजाता प्रकाश गाजरे; यांनी अतिशय रंगतदार आणि हुशारीने ही स्पर्धा जिंकली, त्यांचे पती प्रकाश मोहन गाजरे यांचे त्यांना मोलाचे सहकार्य लाभले, पुढील बक्षीस सोन्याची नथ जिंकण्याचा मान होळे येथील महिला भगिनी सौ.पूनम ज्ञानेश्वर यलपले यांना मिळाला,तसेच तिसरे पारितोषिक शेळवे येथील सौ.आरती प्रमोद गाजरे यांना मिळाले, चौथ्या पारितोषिकाच्या मानकरी ठरल्या त्या शेळवे येथील सौ.ज्योती गणेश गाजरे,तसेच ज्या माता भगिनी कार्यक्रम पाहण्यासाठी आल्या होत्या त्यातील दहा भाग्यवान महिलांना सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारून उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून दहा साड्या भेट देण्यात आल्या.
सदर कार्यक्रमासाठी जी बक्षिसे देण्यात आली होती त्यातील "पैठणी"साठी हाऊस ऑफ कॉम्प्युटर पंढरपूर येथून सौ.उज्वला व श्री.पंढरी बागल यांचे सौजन्य लाभले तर सोन्याच्या नथीसाठी विट्ठल कृपा ज्वेलर्स,पंढरपूर च्या सौ. सुरेखा व श्री.तुकाराम कोरे यांचे सौजन्य लाभले,तिसच्या आणि चौथ्या पारितोषिकासाठी शेळवे येथील सौ.रुपाली व श्री.शंकर गाजरे यांच्या शुभांगी इमिटेशन अँड ज्वेलर्स चे सौजन्य लाभले,दहा साड्यांसाठी विशेष सहकार्य केलं ते पंढरपूर येथील सुमित भैय्या दोषी यांचे समय कलेक्शन पंढरपूर व सौ.अश्विनी व श्री शंकर शिंदे यांच्या शिवसृष्टी कलेक्शन पिराची कुरोली यांनी,सदर स्पर्धेसाठी मनोरंजक व मंत्रमुग्ध सूत्रसंचालन लाभले ते महाराष्ट्र माझा न्यूज चॅनेल्स चे संपादक,सर्वांचे लाडके अविनाश (भावजी) सुर्वे यांचे, न थकता तब्बल पाच तास त्यांनी निवेदन ;सूत्रसंचालन करून स्पर्धा पार पाडण्याचे उत्तम काम केले.
कार्यक्रमाच्या ठिकानी युवा ग्रामिण साहित्यिक अंकुश गाजरे यांच्या सुंदर सुविचार या पुस्तकाचे प्रकाशन आमदार शहाजी बापू पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक धनंजय काळे, सिद्धेश्वर बंडगर तसेच विठ्ठल कालिदास पाटील यांनी आवर्जून उपस्थिती लावली तर शेळवे गावच्या सरपंच सौ. सुनीता अनिल गाजरे, उपसरपंच किरण गाजरे, खेड भाळवणी गावच्या उपसरपंच अश्विनी अविनाश पाटील, उद्योजक बाळासाहेब लोकरे, सदाशिव गाजरे, माजी सरपंच तुकाराम गाजरे, संतोष भालचंद्र गाजरे, जेष्ठ नागरिक विठ्ठल अप्पा गाजरे,धनाजी गाजरे,माजी उपसरपंच दत्तात्रय गाजरे,वाडीकुरोली गावच्या मा.सरपंच अर्चना काळे,आय पि एस राहुल चव्हाण यांच्या भगिनी व भावी प्रशासकीय अधिकारी विद्या चव्हाण, तंटामुक्ती चे अध्यक्ष नामदेव गाजरे,भंडीशेगाव चे युवा नेते समाधान सुरवसे उपस्थित होते,तसेच पंढरपूर परिसरातील सर्व गावातून मान्यवरांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
सदर स्पर्धा पार पाडण्यासाठी प्रशालेतील सर्व स्टाफ यांनी अथक परिश्रम घेतले व सर्व शिक्षक आणि कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला, प्रशालेच्या वतीने सर्व बक्षीसदाते, विशेष सहकार्य करणारे सर्व, उपस्थित सर्व माता, पालक, शिक्षणप्रेमी नागरिक,मित्रपरिवार, विध्यार्थी परिवार, जेष्ठ-श्रेष्ठ मार्गदर्शक यांचे आभार मानण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समाधान तुकाराम गाजरे यांनी केले तर नियोजन संस्थेचे संस्थापक सचिव अंकुश गाजरे यांनी केले, तसेच कार्यक्रमाचे आभार संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष अजित लोकरे यांनी मानून कार्यक्रम संपला असे जाहीर केले.