सोलापूर प्रतिनिधी
केगांव येथील एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागा तर्फे "मेरी माती मेरा देश" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मातीचे पूजन करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे राबविण्यात आलेल्या 'सेल्फी विथ माय सॉईल ' या विषयावर गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्याच्या निर्धार उपक्रमासाठी एका हातात माती घेऊन सेल्फी काढण्यात आले व https://selfiewithmerimaati.in/photoupload/ या लिंक वर अपलोड करण्यात आले.
जमा झालेली सर्व माती अमृत कलशामध्ये साठवली जाणार आहे व पुढील होणाऱ्या वृषारोपण कार्यक्रमासाठी वापरली जाणार आहे.
याप्रसंगी सिंहगड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले,उपप्राचार्य डॉ. रवींद्र व्यवहारे व डॉ. शेखर जगदे, डॉ. दत्तात्रय गंधमल, डॉ. प्रदीप तपकीरे,डॉ. विजय बिरादार, डॉ. विनोद खरात उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर करमाल, अभिषेक लोमटे, सुप्रिया विभुते, सरस्वती साळुंखे व ओंकार बिराजदार यांनी परिश्रम घेतले.