सांस्कृतिक कला निकेतन भुसावळ येथील ४५ कलाकारांनी साकारला कथ्थकरंग
पंढरपूर प्रतिनिधी
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर आयोजित सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके साहेब व्यवस्थापक बालाजी पुदलवाड साहेब आणि सर्व सन्माननीय सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली श्री रुक्मिणी नवरात्र संगीत महोत्सवाचे दुसरे पुष्प आदरणीय कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके साहेब सहपत्नीक, आणि सदस्या शकुंतला नडगिरे मॅडम सर्व मान्यवर कलाकार यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
भुसावळ येथील सांस्कृतिक कला निकेतन यांच्या ४५ कलाकारांच्या समवेत अप्रतिम कथ्थकरंग सादर करत त्यामध्ये कथ्थक चे विविध नृत्याविष्कार सादर करत त्यामध्ये विविध संतचरित्र, त्यामध्ये संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम,संत नामदेव संत चोखामेळा,संत एकनाथ,संत गोरोबा काका,संत जनाबाई,संत बहिणाबाई,आदी संताची चरीत्र सांगत सांगत, सुंदर ते ध्यान, इंद्रायणी काठी,माझे माहेर पंढरी,तिर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, अबीर गुलाल उधळीत रंग, अवघें गरजे पंढरपूर,खेळ मांडियेला,अशा विविध अभंगरचनांवर नृत्य करत अभिनय, नाट्य,गायन, वादन, आणि नृत्य यांचा अप्रतिम मिलाफातून पंढरपूरकर कलारसिकांचे डोळ्यांचे पारणे फेडले. सुंदर रंगमंच व्यवस्था मधुकर गोडबोले आणि तितकीच समर्पक साथसंगत तबला साथ मुकेश खपली,पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे , संगीत संयोजन शंभू गोडबोले नृत्य स्नेहा खपली,श्रृती उपासनी ,कमल पाटील, मुकुंद महाजन,सुनिल पाटील आणि इतर ३५ कलाकारांच्या मुळे कथ्थकरंग अधिक उठावदार झाला.प्रतिवर्षाप्रमाणे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर मधील सांस्कृतिक वारसा जपत कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून विठूरायाच्या सेवेची संधी देत असल्याने कलाकारही धन्य धन्य होत आहेत.
यावेळी पंढरपूरकर कलारसिकांनी भरभरून प्रतिसाद देत तुकाराम भवन गर्दीने फुलून गेले होते.हा नवरात्र संगीत महोत्सव यशस्वी करण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती कर्मचारी वर्ग अधिक परिश्रम घेत आहेत.