सांगोला प्रतिनिधी
सांगोला तालुक्यातील कोळे ग्रामस्थांच्या वतीने सांगोला विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय पाणीदार आमदार शहाजी बापू पाटील यांच्या सन्मानार्थ माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर , सत्कारमूर्ती आमदार शहाजी बापू पाटील माजी आमदार दीपक साळुंखे पाटील, उद्योजक भाऊसाहेब रुपनर, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, युवा नेते सागर पाटील ,गुंडा खटकाळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मंगळवारी कोळ्यात हालगीच्या तालावर , फटाक्याची आतिषबाजी , भंडा-याची मुक्त उधळण करीत मोठ्या जल्लोषात बैलगाडी शर्यतीचा थरार पार पडला.यावेळी बैलगाडी शर्यतीचा थरार ' याची डोळा यांची देही ' पाहण्यासाठी मोठ्या संख्येने परिसरातील आबालवृद्धांसह, ग्रामस्थ , बैलगाडी शौकीन यांनी उपस्थित राहून स्पर्धकांना प्रोत्साहन दिले. या बैलगाडीशर्यतीसाठी शेजारील कर्नाटक राज्यासह पश्चिम महाराष्ट्र सोलापूर जिल्ह्यातील सुमारे ६५ बैलगाडी स्पर्धक सहभागी झाले होते.
शर्यतीच्या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे खा.रणजितसिंह निंबाळकर, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे ( अजित दादा गटाचे ) जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंखे पाटील, सत्कारमूर्ती आमदार शहाजी बापू पाटील यांची वाजत गाजत मिरवणूक काढली. यावेळी ग्रामस्थांनी जेसीबी मधून आमदार शहाजी पाटील यांच्या मिरवणूकीवर तब्बल १० टन झेंडू फुलांची उधळण करत त्यांचे जंगी स्वागत केले . कोळे ग्रामस्थांच्या वतीने आमदार शहाजी बापू पाटील यांचा केक कापून फेटा बांधून शाल श्रीफळ , पुष्पहार घालून श्री. विठ्ठलाची मूर्ती देऊन सत्कार केला.
याप्रसंगी संभाजी आलदर , सरपंच पती हरिभाऊ सरगर, अतुल पवार, नवनाथ पवार, सांगलीचे संजय हजारे, आप्पासाहेब सरगर, श्रीमंत सरगर,बिरापंच आलदर, उद्योजक किरण पांढरे,शहाजी हात्तेकर, शिवाजी घेरडे, भैय्या साहेब बंडगर, संजय मेटकरी,शंकर तोडकरी,रामचंद्र आलदर, विलास व्हनमाने, काकासाहेब नरळे, बाळासाहेब कोळेकर, अंकुश आलदर, अभिजीत नलवडे, धनंजय काळे यांच्या सह मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान विजेत्या बैलगाडी स्पर्धकांना रोख स्वरूपात सुमारे ५ लाख रूपयांचे बक्षीसे देऊन सन्मान केला बैलगाडी शर्यत स्पर्धेसाठी कोळे ग्रामस्थांसह रावसाहेब आलदर,पंढरी आलदर,सय्याप्पा सरगर, गंगाराम सरगर,चोरमुले टेलर आदींनी परिश्रम घेतले प्रास्ताविक सूत्रसंचालन अशोक आलदर यांनी केले तर आभार निलेश मदने यांनी मानले.