भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुकयातील भाळवणी येथील मुस्लीम बांधवानी श्री विठ्ठल रुकमिणी मंदिर समिती सदस्य व शिवसेना पंढरपूर विभाग जिल्हाप्रमुख संभाजी राजे शिंदे यांचा शाल,श्रीफळ,फेटा बांधून ज्येष्ठ मार्गदर्शक ई .बा. मुलाणी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.हा सत्कार समारंभ लुकमान इनामदार व आयाज इनामदार यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता.
यावेळी दादा मामा गवळी, शिराज शेख, दिपक गवळी,दाऊद शेख,रणजित जाधव,अंकुश गायकवाड,मच्छिंद्र गायकवाड आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शिंदे म्हणाले की आपल्याला गावा साठी खूप काम करायचे आहे.माझ्या वर खोट्या केसेस दाखल करून मी पुढे राजकीय काम थांबवेल अशी अपेक्षा होती.पण आपण सर्वांना माझ्या पाठीमागे उभे राहून मला पुढील कार्यास पाठबळ दिले आहे.यापुढे ही आपल्याला मदत करण्यास तयार आहे.अशीच साथ कायम राहील हिच अपेक्षा मी व्यक्त करतो.
यावेळी ई.बा.मुलाणी म्हणाले की गावात काय घडले तर कोणाकडे दाद मागायची हा मोठा प्रश्न उभा राहतो.पण संभाजी राजे हे सर्वांना सोबत घेऊन जाणारे नेते आहेत.त्यामुळे यापुढील काळात आम्ही निश्चित पणे संभाजी राजे यांच्या पाठीशी खबीरपणे उभे राहून सहकार्य करू.असे ही मुलाणी म्हणाले.
यावेळी आनंद देशपांडे, भिमराव जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नितीन शिंदे यांनी केले.तर आभार शकील काझी यांनी मानले.यावेळी मुस्लीम बांधव,ग्रामस्थ उपस्थित होते.