पंढरपूर प्रतिनिधी
यु डायसच्या स्टुडन्ट पोर्टलला लागणाऱ्या गरजेनुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विकासवाडी येथे दिनांक 21 ऑक्टोबर 2023 रोजी रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
हे शिबिर पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक सांगले सर व उपशिक्षक मस्के सर तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संभाजी देठे, विष्णुपंत लोखंडे, समाधान देठे यांची मोलाची साथ लाभली. हे शिबिर आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्सेस फुलेनगर अकलूजचे संचालक प्रा. निलेशकुमार आडत व त्यांचे विद्यार्थी रोहिणी मस्के व अनुराधा मिटकल यांच्या सहकार्याने पार पडले. या शिबिरात धोंडेवाडी व विकासवाडी शाळेतील १५० विद्यार्थ्यांचे रक्तगट तपासण्यात आले.
या प्रसंगी शाळा तपासणी साठी आलेले सोलापुर जिल्हा सत्र न्यायाधीश लंबे साहेब, गटशिक्षण अधिकारी लिगाडे साहेब, व शाळा तपासणी समिती पंढरपूर मधील सर्व अधिकारी यांनी भेट दिली.