पंढरपूर प्रतिनिधी
श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ पंढरपूर, संचलित श्री दत्त विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय,सुस्ते येथे हिंदी दिवस साजरा करण्यात आला.प्रमुख अतिथी म्हणून विवेक वर्धिनी विद्यालय, पंढरपूर येथील हिंदी विषयाचे अध्यापन करणारे सहशिक्षक राजुभाई मुलाणी होते त्यांनी विद्यार्थ्यांना हिंदी दिवसाचे महत्त्व सांगून आपल्या दैनंदिन व्यवहारात शुध्द हिंदीचा वापर करावा असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रशालेचे प्राचार्य प्रा.श्री.सुधाकर पिसे होते.प्रास्ताविक व ओळख जैनुद्दिन शेख यांनी करून दिली.हिंदी दिनानिमित्त घेण्यात आलेल्या हिंदी निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आले.यावेळी काही विद्यार्थ्यांची भाषणे झाली.
सुत्रसंचालन वैशाली गायकवाड या विद्यार्थिनीने केले.हिंदी दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष डॉ.मदन क्षीरसागर, उपाध्यक्ष प्रा.शिवाजी वाघ, सचिव ॲड.वैभव टोमके, सहसचिव अजित नडगिरे, खजिनदार सलीम वडगावकर,जेष्ठ संचालक दिलीप घाडगे,जैनुद्दीन मुलाणी,अनिरुद्ध सालविठ्ठल,आप्पासाहेब चोपडे, मुकुंद देवधर, विजयकुमार माळवदकर यांनी विद्यार्थी,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील पर्यवेक्षक रणजित शिनगारे यांचे सह सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.