मुंबई प्रतिनिधी
महेश ढवळे साहेब यांच्या प्रयत्नांना यश 3 सप्टेंबर रोजी पंढरपूर येथे अखिल भारतीय क्षत्रिय नामदेव महासंघाच्या महत्वपूर्ण मीटिंग संपन्न झाली होती. या मीटिंगमध्ये समस्त शिंपी समाजाच्या विविध मागण्यांविषयी सखोल चर्चा होऊन महत्वपूर्ण ठराव पारित करण्यात आले.
नुकतेच अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेश ढवळे यांनी मंत्री छगनराव भुजबळ व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पंढरपूर येथे झालेल्या विविध ठराव व निवेदन सादर केली होती.
त्या अनुषंगाने अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज दिनांक १४ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिंपी समाजाच्या प्रलंबित मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या म्हणून त्यांचे पत्र पाठवलेले असून शिंपी समाजाच्या प्रलंबित मागण्यांविषयी शासनाने लवकर मान्य कराव्यात.
यासाठी महेश ढवळे यांनी केलेल्या प्रयत्नांना संत नामदेव महाराज लवकरच यश देतील हयाच त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.