सोलापूर प्रतिनिधी
यात हकीकत अशी, फिर्यादी यांच्या मुलीचा विवाह आरोपी देविदास दत्तात्रय मिरजकर यांच्यासोबत 2020 मध्ये झालेला होता. लग्न झाल्यापासून सुरुवातीची काही वर्ष आरोपीने पत्नी यास व्यवस्थित नांदवले होते, परंतु त्यानंतर आरोपीने मोटरसायकल घेण्याकरिता माहेरून 15000 रुपये घेऊन ये असे तगादा लावत असे व मारहाण आणि शिवीगाळ करत होते. यातील इतर 4 आरोपी फिर्यादीच्या मुलीस तिच्या नवऱ्याच्या उपचाराकरिता माहेरून 10000 रुपये आणून दे नाहीतर माहेरी निघून जा, पैसे आण नाहीतर कुठेतरी जाऊन मर असे म्हणत होते.
त्यामुळे फिर्यादीची मुलगी आरोपींच्या जाच हट्टास कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली केली होती, अशा आशयाची फिर्याद आरोपींन विरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे भादवि कलम 306 ,34 अन्वे गुन्हा दाखल केला होता. सदर आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला होता. माननीय उच्च न्यायालयाने या प्रकरणांमध्ये आरोपींना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. माननीय मुंबई उच्च न्यायालयात आरोपी तर्फे ॲड. कदीर औटी, ॲड. रुई धानावाला, सुयश खोसे यांनी काम पाहिले.