लेखणी बोलते तेंव्हा आपल्या विचारांना एक प्रकारची धार चढते. आपल्या लिखाणातून मनातील भावना साहजिकच कागदावर उतरतात. मनाला एकदम हलके हलके वाटते. कारण मन मोकळे करायचे असेल तर लिखाण त्याच्या सोबतीला लेखणी महत्त्वाचीच आहे. या लिखाणातून एक वेगळ्याच प्रकारचा निर्भेळ आनंद मिळतो. मनाला एक प्रकारचे खाद्य मिळते. त्याच्या जोडीला वाचन असेल तर दुधात साखरच. म्हणूनच वाचनही खूप महत्त्वाचे आहे. कारण वाचन ही मनाचे खाद्य आहे असे म्हणतात. या वाचनातून आपल्या लिखाणाला उभारी येते. आपल्या लेखणीतून आपण कोणालाही न दुखावतात छान प्रकारचे विचार मांडू शकतो. समाजातील जाणीव जागृतीचे तत्त्वज्ञान आपल्या लेखणीतून आपल्या वाचकांपर्यंत आपल्याला पाहिजे तसे पोहोचवता येते. म्हणून लिखाण खूप गरजेचे आहे. आपण जर नित्य वाचन करीत राहिलो तर आपसूकच मनन चिंतन घडते. त्यातून आपल्या लिखाणाला आपल्याला हवे तसे शब्द गवसतात. शब्दही अशी जादू आहे त्यामुळे जीवन घडते. एखाद्याच्या जीवनात अंधार असेल तर आपण आपल्या गोड शब्दांनी त्याचे जीवन प्रकाशमान करून टाकू शकतो. पण आपले शब्द जर कडवट झाले तर त्याचे जीवन निराश्मय होते. म्हणून आपण नित्य चांगले वाचन केले पाहिजे. त्यामुळे साहजिकच लिखाण देखील दर्जेदार बनेल. आणि आपली लेखणी बोलू लागेल. म्हणूनच चांगल्या शब्दांनी आपण लेखक कवी व कवयित्रीनी इतरांच्या जीवनात नंदनवन फुलवले पाहिजे. लेखणी बोलते तेव्हा आपण अनेक शब्दांची उकल, अनेक संज्ञा आपल्याला पाहिजे तशा मोजक्या शब्दातून व्यक्त करू शकतो. लेखणी बोलते तेव्हा आपल्या लिखाणातून एखाद्याच्या डोळ्याच्या कडा ओलावतात. कधी कधी त्या व्यक्तीला वाटते अरेच्चा या लेखकांनी आपलेच तर जीवन, आपलाच प्रवास, आपलीच कथा व व्यथा या लिखाणात उतरली आहे. आणि त्या व्यक्तीला आपल्या लिखाणातून एक अनमोल प्रकारचा संदेश देखील मिळू शकतो. म्हणून ती व्यक्ती सतत ते आपले लिखाण वाचत राहते. आणि त्याचे जीवन प्रकाशमय होऊ शकते. या लेखकाच्या किंवा लेखिकेच्या लिखाणात खूप ताकद आहे असे त्या वाचकाला वाटू लागते. साहजिकच ही लेखणी आपल्याला प्रगतीपथावर पोहोचवते. म्हणून आपण अनेक मासिकातून, पुस्तकातून लिखाण केले पाहिजे. कधी कधी समाजातील सर्वांना अवघड असणारा विषय आपण आपल्या लिखाणातून कोणाला न दुखावता सहजरीत्या मांडू शकतो. आणि समाजापर्यंत त्याचा योग्य तो संदेश पोहोचू शकतो. म्हणून आपण सतत काही ना काही तरी लिहीत राहिले पाहिजे. लेखणी बोलते तेव्हा आपण अवघड विषय सुलभ करू शकतो. समाजाला अनमोल अशा संदेशाकडे वळवू शकतो. लेखणी बोलते तेव्हा साहजिकच क्लिष्ट विषयांना सोपे करून आपण वाचकांपर्यंत, त्यांच्या हृदयापर्यंत तो विषय आपल्याला पाहिजे तसा नेऊ शकतो. म्हणून आपली लेखणी सतत चालती बोलती असली पाहिजे. या लेखणीने आपण आपला समाज सदृढ, सशक्त करू शकतो. कारण आपण सुद्धा समाजाचे काहीतरी देणे आहे. मग या समाजाचे ऋण आपण अशा रीतीने फेडू शकतो. आपली लेखणी निराश झालेल्या मनाला आशेच्या वाटेकडे वळवू शकते. एक चांगल्या प्रकारचा संजीवन त्याला पाजू शकते. जेणेकरून ती व्यक्ती आपल्या विचारांनी सदृढ होऊन सकारात्मक विचार करू शकेल. आपल्याला लेखनीत खूप मोठी ताकद आहे. लेखणी बोलते तेव्हा एखाद्याला आशेचा मार्ग गवसेल. जर आपल्याला आपल्या आयुष्यात काही स्वप्न पूर्ण करता नाही आली तर, निराश न होता आशेने आपण त्या गोष्टींकडे पाहिले पाहिजे. प्रत्येक गोष्टीकडे आपल्या लिखाणाचा कल सकारात्मक हवा. म्हणजे आपल्या आयुष्यात सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या होतील. लेखणी बोलते तेव्हा वाचकांच्या हृदयापर्यंत आपल्याला आपला विषय तितक्याच पोट तिडकीने पोहोचवता आला पाहिजे. तरच आपण चांगले कवी लेखक किंवा कवयित्री बनू शकतो. कोणालाही न दुखावतात आपण आपला विषय सहजरीत्या लिखाणातून मांडू शकतो. त्या व्यक्तींना तो विषय आपलाच वाटू लागतो. आपलेच वर्णन, आपलीच जीवन कथा या लिखाणात आहे असे वाटू लागते. मग त्याच्या मनावर एक चांगल्या विचारांचा प्रभाव पडू लागतो जो त्याचे जीवन आनंदी, समाधानकारक, उत्साहवर्धक बनेल.
लेखणी बोलते तेव्हा अनेक विषयांना हात घालता येतो. समाजातील सत्य परिस्थितीचे वर्णन, माणसाच्या मनस्थितीचे वर्णन, निसर्गाची महती, पर्यावरणाची माहिती, चालू घडामोडीतील प्रत्येक घटनांचे वर्णन आपण आपल्या या धारदार सुंदर गोड लेखणीतून करू शकतो. आपण आपल्याला पाहिजे तसा विषय आपल्या लेखणीतून वाचकांपर्यंत पोहोचला की आणखी कोणते समाधान हवे आहे. हेच समाधान म्हणजे आपली श्रीमंती. ही श्रीमंती आपल्याकडून कोणीच काढून घेऊ शकत नाही. उलट की दिवसों दिवस वाढतच जाते. आणि मनाची श्रीमंती हेच खरं जीवन जगण्याचं संजीवन नाही. आपल्या जीवनात कितीही अवघड प्रसंग येऊद्यात, दुःखद प्रसंग असू द्या पण आपले मन जर खंबीर असेल, भक्कम असेल तर कोणीच काही करू शकत नाही. कारण ते दुःखाचे क्षण, दुःखाचा प्रवास आपल्याबरोबर काही क्षणांसाठीच असणार आहे. फक्त आपल्याला तो क्षण व्यवस्थित रित्या हाताळता आला पाहिजे. त्या दुःखाचे ,त्या दुःखद क्षणांचे भांडवल न करता हेही क्षण निघून जाणार आहेत आणि सुख आनंद आपल्याकडे चालून येणार आहे त्या दृष्टीने आपणही प्रयत्न करणार आहोत असं एक चांगलं औषध आपण आपल्या मनाला पाजले की, एक छान प्रकारचे टॉनिक आपल्या आयुष्याला उभारी देणार आहे. म्हणून लेखणी बोलते तेव्हा, खूप काही घडते. मनासारखे होते. विषयाचा मतितार्थ छान प्रकारे कळतो. कोणालाही न दुखावता आपण आपला विषय सहजरीत्या मांडू शकतो. वाचकांच्या अनेक निराशवादी गोष्टींना आशेच्या प्रयत्नांकडे नेऊ शकतो. माणूस म्हणून एक चांगल्या प्रकारचे कार्य करू शकतो. समाज व्यवस्थेचे यथार्थ वर्णन करू शकतो. वाचकांच्या हृदयात स्थान मिळू शकतो. गगनभरारीचे पंख लावू शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्मविश्वासाचे बळ आपल्याकडे सहाजिकच येते. प्रयत्नांची कसोटी गवसते. आशेचा कवडसा आपल्या आयुष्यात प्रवेश करतो. इतरांनाही आपण आनंदी व समाधानी ठेवू शकतो. सर्वांच्या ज्ञानात भर पाडू शकतो. समाजाच्या उन्नतीचे एक महत्त्वाचे साधन म्हणजे लेखणी होय. ही लेखणी ज्याला सापडली त्याच्यासारखा भाग्यवान या जगात नाही. म्हणून लेखणी बोलते तेव्हा सारं जग कवेत येते. त्या विचारांचा एक वेगळंच तेज त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर असतं. हे तेज कोणत्याही क्रीम किंवा मेकअप पेक्षा जास्त टिकाऊ निरंतर असतं.
लेखणी बोलते तेंव्हा या विषयाविषयी जेवढे लिहावे तेवढे थोडेच आहे. सारांश रूपाने लेखणी बोलते तेंव्हा याविषयी असे म्हणता येईल.
*"लेखणी बोलते तेव्हा*
*कवडसा गवसतो आशेचा,*
*अनुभवांचे गाठोडे मिळूनी*
*अंत होतो निराशेचा.*
लेखिका---
श्रीमती.वंदना शरद चंद्र पाटणे,
जि.प.प्रा. केंद्रशाळा, महुद बु
तालुका-सांगोला, जिल्हा-सोलापुर