मुंबई प्रतिनिधी - गणेश हिरवे
संत नामदेव महाराज यांच्या ६७३ व्या संजीवन समाधीचे औचित्य साधत मुंबईतील शिक्षिका सुधा मयेकर-सुर्वे यांनी त्यांच्या दिवंगत वडिलांचे वाढदिवसाची (१५ जुलै) आठवण म्हणून आज मुंबईतील २६ दृष्टीहीन कुटुंबियांना किराणा किट भेट ( तांदूळ, डाळ, साखर, पोहे, रवा,कोलगेट,बाथ सोप, पॅराशूट तेल, भांडी साबण,) देऊन एका अगळ्यावेगळ्या पद्धतीने वडिलांची आठवण जपली.यामुळे मयेकर कुटुंबियांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जॉय ऑफ गिविंग संस्थेचे संस्थापक गणेश हिरवे हे आवर्जून उपस्थित होते.या गरजूंना सहकार्य केल्यामुळे एक वेगळे समाधान व आनंद झाल्याचे उपस्थित सुलोचना मयेकर, सुनील सुर्वे व सुधा सुर्वे यांनी सांगितले व यापुढेही समाजातील वंचित घटकांसाठी आम्ही पुढाकार घेणार असल्याचे उपस्थित सर्वच मान्यवरांनी सांगितले.
हिरवे सरानी या पूर्वीही अनेकवेळा विविध माध्यनातून आम्हाला मदत केल्याचे दृष्टीहीन समूहाचे समन्वयक सुरेश पवार व चंद्रा यांनी सांगून ज्यांचा वाढदिवस होता त्या मयेकर पसरीवरसाठी यानिमित्ताने विशेष कामना करण्यात आली.

