सोलापूर प्रतिनिधी
केगाव येथील एन.बी.नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्याल यातील ६ विद्यार्थ्यांची ' हिताची ' या नामांकित कंपनीत कॅम्पस मुलाखती तून निवड झाली असून त्यांना वार्षिक ५ लाख रुपयांचे पॅकेज मिळाले आहे. हिताची कंपनी ही माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, ऊर्जा प्रणाली, सामाजिक पायाभूत सुविधा, औद्योगिक प्रणाली आणि बांधकाम यंत्रसामग्रीमध्ये असलेले बहुराष्ट्रीय समूह असून ही कंपनी जपान, चीयोडा टोकीयो या नामांकित देशात त्यांचे ऑफिसेस आहेत.
या कंपनीमध्ये ट्रान्सफॉर्मर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ऑटोमेशन, इंडस्ट्रियल मशिनरी, पॉवर प्लांटस, इलेक्ट्रिकल सबस्टेशन्स, इन्फॉर्मेशन सिस्टीम, ऑटोपार्टस, रोलिंग स्टॉक, इलेवाटोर आणि एस्कॅलेटर, डिफेन्स टेक्नॉलॉजी, सुपर कॉम्प्युटर, सेमिकंडक्टर इत्यादीचे उत्पादन करते.
अशा नामांकित कंपनीत निवड प्रक्रियेतून जाण्यासाठी सिंहगड अभियांत्रिकी महाविद्या लयात विद्यार्थ्यांना तज्ञ प्राध्यापकांकडून ट्रेनिंग दिले जाते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक परिश्रम घेत असतात. यामुळे विद्यार्थी या निवड प्रक्रियेतून सहजरीत्या जाऊ शकतो.
या सर्व विद्यार्थ्यांचे सिंहगड संस्थेचे सहसचिव संजय नवले, प्राचार्य डॉ. शंकर नवले, उपप्राचार्य डॉ.रवींद्र व्यवहारे व शेखर जगदे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. विकास मराठे, डॉ. दत्तात्रय गंधमल, डॉ. प्रदीप तपकिरे,प्रा. विजयकुमार बिरादार, डॉ. विनोद खरात, सिंहगड पब्लिक स्कूलच्या प्राचार्या निकत शेख तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

