पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
आषाढी एकादशीचा सोहळा पंधरा दिवसांवर आला असून पंढरी नगरीत भक्ती सोहळा साजरा करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लक्षावधी भाविक भक्त नागरिक शिव भक्ती सोहळा साजरा करण्यासाठी येतात आलेल्या भाविकांच्या रक्षणाची जबाबदारी येथील पोलीस प्रशासनावर असली तरीही वारीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता या सर्वावर लक्ष ठेवण्यासाठी तिसरा डोळा सज्ज अर्थात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आले आहेत.
आषाढी यात्रेच्या निमित्ताने आलेल्या भाविकांना शहरातून फिरताना खिसे कापू महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीला जाणे मोबाईल चोरीला जाणे तसेच फसवणूक होऊ नये याकरता शहराच्या विविध भागात सुमारे 250 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून शहरातील महत्त्वाचे चौका चौकात 160 तर मंदिर परिसरात 90 ते 100 च्या आसपास 11 सीसीटीव्ही कॅमेरे या सर्वावर नजर ठेवणार आहेत.
शिवाय साध्या वेशातील पोलीसही राहणार असून भाविकांच्या रक्षणासाठी काही पोलीस वारकऱ्यांच्या विषयातही शहरात नजर ठेवणार आहे शहरातील महत्त्वाची गर्दीची ठिकाणे या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून अद्यापही सीसीटीव्ही कॅमेरे ची गरज आहे याकरता सुमारे 750 प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे.
आषाढी यात्रेच्या सोहळ्याच्या निमित्ताने पंढरीचा भाविकांची गर्दी हळूहळू वाढू लागली आहे. आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरी नगरीत येणाऱ्या भाविकांच्या सोयी सुविधा कडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे त्याचाच एक भाग म्हणून शहरात विविध ठिकाणी महत्त्वाच्या चौकात वाळवंट मंदिर परिसर या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत आता या कॅमेरा मुळे शहरात गैरप्रकार करणाऱ्या वर तात्काळ कारवाई करण्याचे काम सोपे होणार आहे.
त्यामुळे आता वारीत अशा लोकांवर आता तिसऱ्या डोळ्याची अर्थात सीसीटीव्हीची 24 तास नजर राहणार असून याचे कंट्रोल रूम पंढरपूर शहर पोलीस स्टेशन मध्ये असून तेथे बसून अधिकाऱ्यांना कुठल्या भागात गैरप्रकार किंवा एखादे चोरीची घटना घडताना दिसत असताना त्या परिसरात बंदोबस्तास असलेल्या पोलीस व अधिकाऱ्याला ताबडतोब कल्पना देऊन असे गैर कृती करणाऱ्या व्यक्तीस ताब्यात घेण्यास मदत होणार आहे.