पंढरपूर प्रतिनिधी संपत लवटे
श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित लोटस इंग्लिश स्कूल कासेगाव मधील विद्यार्थ्यांना जनरल नॉलेज ऑलिम्पियाड फाऊंडेशन यांच्या तर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे.
यश संपादन केलेली विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे इंटरनॅशनल झोनल इयत्ता ३री मधून आरोही पिंगळे,नंदन शेटे,आणि दुर्गा मानेदेशमुख यांनी प्रथम क्रमांक मिळवला तर या विद्यार्थ्यांना इंटरनॅशनल सर्टिफिकेट झोनल सुवर्णपदक आणि रोख पारितोषिक देण्यात आले.तसेच इयत्ता ४ थी मधून हिरण्या चोपडे,मृण्मयी ठाकरे,हिने इंटरनॅशनल रँक ४था क्रमांक पटकाविला. हिरण्या चोपडे आणि मृण्मयी ठाकरे या विद्यार्थिनींना झोनल गोल्ड मेडल आणि झोनल एक्सलन्स सर्टिफिकेट आणि रोख पारितोषक देण्यात आले.तर प्रतीक्षा खोत या विद्यार्थिनीचा झोनल रँक १०वा,तर सानवी झांबरे झोनल रँक ७ वा आणि रोख पारितोषक देण्यात आले अशी माहिती लोटस इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या.डॉ.जयश्री भोसले यांनी दिली.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे, अध्यक्ष एच.एम.बागल उपाध्यक्ष बी.डी. रोंगे,खजिनदार दादासाहेब रोंगे तसेच सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक वर्गातून अभिनंदन केले जात आहे.