सोलापूर प्रतिनिधी
कॉंग्रेस पक्षावर नितांत प्रेम असलेल्या एका गिरणी कामगारापासून NSUI, युवक कॉंग्रेस, सेवादल, इंटक आणि सोलापूर शहर काँग्रेसच्या सतत अकरा वर्ष अध्यक्षपद, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस सरचिटणीस पद भूषविलेल्या, ज्यांच्या नेतृत्वाखाली अनेक निवडणुका लढविल्या आणि जिकल्या, संपूर्ण महाराष्ट्रात ओळख असलेल्या, सर्वांना एकत्र घेऊन जाऊन काम करायची पद्धत असलेल्या, आयुष्यभर सर्वसामान्य, गोरगरीब जनता, मिल कामगारांची सेवा केलेल्या कै. धर्माजी रामकृष्ण भोसले यांच्या पुण्यतिथी निमित्त N. G. मिल चाळ बाल हनुमान मंदिर येथे ह. भ. प. महादेव बुवा शिंदे महाराज चॅरिटेबल ट्रस्ट सोलापूर आयोजित अखिल भारतीय वारकरी मंडळाचे जिल्हा अध्यक्ष धामणगाव पंढरपूरचे ह. भ. प. डॉ. किरण महाराज बोधले यांचे गुलाल व कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी उपस्थित सर्वांना ह. भ. प. डॉ. बोधले महाराज आपल्या रसाळ वाणीतून कीर्तनातून प्रबोधन केले. तसेच यावेळी ते म्हणाले की, हरीचे कीर्तन उत्तम आहे चांगले आहे कारण कीर्तन कारणाऱ्याचा देह हा हरीरुप होतो म्हणून हरी कीर्तनात सहभागी व्हावे. आज कै. धर्माजी भोसले यांच्या पुण्यतिथी निमित्त गुलाल व कीर्तनाचा कार्यक्रम त्यांचे सुपुत्र विनोद भोसले, अमोल भोसले यांनी ठेवला आहे. पुण्यतिथी करायला काहीतरी पुण्य करायला लागते. आणि पुण्याईचे धन कोणीही चोरून नेऊ शकत नाही धर्माजी भोसले यांनी आयुष्यभर माणसे जोडले त्यांची कामे केली त्याच्या अडचणी सोडविल्या. लोकांचे जीवनात परिवर्तन करण्याचे पुण्याईचे कार्य आयुष्यभर केले सर्वांना सोबत घेऊन काम करायचे धर्माजी भोसले शरीराने जरी राजकारणी होते पण मनाने अध्यात्मिक व्यक्तिमत्व होते म्हणूनच आज त्यांच्यासारख्या व्यक्तीची पुण्यतिथी साजरा होत आहे. आणि आज त्यांच्याच वारसा त्यांचे सुपुत्र विनोद भोसले, अमोल भोसले समर्थपणे सांभाळत आहेत.
यावेळी ह.भ.प. तुकाराम महाराज देवकते, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज चव्हाण, ह.भ.प. सुभाष महाराज शिंदे, मा. सोमपा गटनेते चेतन नरोटे, शिवसेना जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे, माजी परिवहन समिती सभापती राजनभाऊ जाधव, माजी महापौर दिलीपभाऊ कोल्हे, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस संतोषभाऊ पवार, सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार, युवा सेनेचे विठ्ठल पंत वानकर, माणिक अक्कलवाडे, सुभाष गडदे, प्रदेश सेवादल चिटणीस अशोक कलशेट्टी, राजाभाऊ महाडिक, प्रवीण जाधव, वाहिद बिजापुरे, राहुल वर्धा, मयूर खरात, महेश लोंढे, तिरुपती परकीपंडला, दीनानाथ शेळके, जगदीश घाटे, संजय गायकवाड, सुभाष वाघमारे, यांच्यासह कै. धर्माजी भोसले यांच्यावर प्रेम करणारे बंधु भगिनी, गणराज तरुण मंडळ सर्व कार्यकर्ते व बाल हनुमान भक्त भजनी मंडळ, विनोद भोसले अमोल भोसले मित्रपरिवार उपस्थित होते.